मुंबई येथील ललीत हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; हॉटेलची सुरक्षा वाढवली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील ललीत हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली असून, सोमवारी संध्याकाली सहाच्या सुमारास फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.
या धमकीनंतर या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने हॉटेमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तसेच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी अज्ञाताकडून 5 कोटींच्या खंडीणीची मागणी करण्यात आली. यानंतर हॉटेल प्रशासनाकडून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी कलम 385, 336 आणि कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
धमकीनंतर पोलिसांनी तपासाची सुत्र हलवली असून, यासाठी सायबर पोलिसांचीदेखील मदत घेतली जात आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये कोणतीही ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, फोन करून धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण असे करण्यामागे नेमका उद्देश काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, धमकीनंतर हॉटेलची तपासणी केली असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्फोटकं आढळून आली नाही. त्यामुळे हा फेक कॉल होता हे उघड झाले आहे.