गोव्याला फिरायला गेलेल्या प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- हरियाणातील भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम, टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचं निधन झालं आहे. सोमवारी रात्री गोव्यात त्यांचं निधन झालं. ही बातमी समोर येताच त्यांच्या करोडो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर येत आहे. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. सोनालींसमोर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. भाजपच्या हरियाणा युनिटनेही त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
सोनालीचे पती संजय फोगट भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनालीने भाजपमध्ये प्रवेश केला. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसकडून लढणाऱ्या कुलदीप यांनी 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणूक लढली होती.
सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगटने सोमवारी रात्रीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनालीने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 14 व्या सिझनमध्ये भाग घेतला होता. सोनाली फोगट टिकटॉक स्टार आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे. याशिवाय काही व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल सुद्धा होतात.