भरदिवसा राष्ट्रीय महामार्गावर प्राणघातक हल्ला करून महागाव येथील व्यापाऱ्यास लुटले ; दरोडेखोर पसार ; लुटारूंनी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
वसूल करून परतणाऱ्या व्यापाऱ्यास अज्ञात दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला करून लाखों रुपयांची बॅग घेवून दरोडेखोर पसार झाल्याची घटना आज दुपारी ४ च्या सुमारास खडका येथील उड्डाणपुलावर घडली आहे. अनिल गंभीरमल शर्मा असे गंभीर जखमी किराणा व्यापाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार.
नेहमीप्रमाणे अनिल शर्मा
वसुलीकरिता नांदेड जिल्ह्यातील वाई बाजार येथे आपल्या दुचाकीने गेले होते.परत येत असताना खडका उड्डाणपुलावर अज्ञात लुटारूंनी पाळत ठेवून त्यांची दुचाकी अडवली. व हातावर आणि त्यांच्या शरीरावर चाकूचे गंभीर वार करून रकमेची बॅग जबरदस्तीने पळविली.आज बुधवारी ४ वाजताच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. रोड रॉबरीच्या या घटनेत व्यापारी अनिल शर्मा हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी तातडीने पुसद येथे भरती करण्यात आले आहे. बॅगमध्ये वसुलीची लाखो रुपये रक्कम असल्याचे कळते. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असून अनिल शर्मा यांची मोटर सायकल व चपला अस्ताव्यस्त पडून आहेत .घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळ गाठून पुढील कार्यवाही सुरू केली असून दरोडेखोरांना शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..