यवतमाळमध्ये रानभाजी महोत्सव आता १५ ऑगस्टला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ,दि.१४ ऑगस्ट :- कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र यवतमाळ येथे १५ ऑगस्ट २०२२ रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी हा महोत्सव 17 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार होता त्यात बदल करण्यात आला आहे.
मानवी आरोग्यासाठी सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व असल्याने विविध भाज्यांचा आहारात समावेश आवश्यक आहे. सद्यस्थितीत रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे , रानफळांचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंत्री संजय राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवाचा यवतमाळच्या जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..