दिग्रस मध्ये निघणार भव्य तिरंगा रॅली ; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे तिरंगा उत्सव समितीचे आव्हान….
पॉलिटिकल स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त दिग्रस मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन तिरंगा उत्सव समिती दिग्रस च्या वतीने शनिवारी दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे.ही रॅली सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शंकर टॉकीज, दुर्गा माता चौक, कमान गेट, कच्ची चौक, घंटी बाबा मंदिर,वाल्मिक नगर, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, या मार्गाने मार्गक्रम होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिकांचा सत्कार करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप होईल. रॅली ही पायी असणार आहे. रॅलीत दोन आकर्षक झाकी राहणार असून त्या भारत माता असेल. तसेच देशभक्तीपर गीत वाजवल्या जातील. हा पैदल मार्च शिस्तीत जाणार असून तिरंगा हातात घेऊन या रॅलीमध्ये फक्त वंदे मातरम्, भारत माता की जय, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा हे नारे लावण्यात येणार आहे. ही रॅली कोणत्याही राजकीय पक्ष व संघटनाची राहणार नसून ही रॅली सर्व राष्ट्रप्रेमीची राहील.या रॅलीत तिरंगा झेंडा घेऊन पारंपरिक वेशभूषा करून अथवा पांढरे कपडे परिधान करून यावे. नसल्यास इतर नेहमीच्या वेषात सुद्धा येता येईल. राष्ट्रप्रेमी यांनी या रॅलीत जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंपूर्ण उपस्थितीत राहावे असे आवाहन तिरंगा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या रॅली माजी सैनिक, पोलीस पथक, विविध मान्यवर, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी,विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालय व शाळेचे विद्यार्थी , तथा राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या रॅलीत राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही. याची दक्षता प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याने भान ठेवण्याचे आव्हान तिरंगा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..