शपथ झाली पण खाते वाटपाला ब्रेक ; मंत्र्यांनी मागितले तीन ऑप्शन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 11 ऑगस्ट :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
या विस्तारानंतर अजूनपर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. या खातेवाटपाला आता उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सगळ्या मंत्र्यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत आमदारांनी दोन-तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खात्यांशिवाय प्रत्येक मंत्र्याकडून दोन ते तीन बंगल्याचे ऑप्शनची मागणी करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. मंत्र्यांनी दोन-तीन खाती आणि बंगल्याचे ऑप्शन मागितल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेणार आहेत. खातेवाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस प्रयत्न करणार आहेत. राज्याचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
या अधिवेशनाआधी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल, अन्यथा विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जाईल.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता राज्यात 20 मंत्री आहेत. मंगळवारी भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे यांनी शपथ घेतली, तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….