देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांनी शपथ घेतली……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली .

विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपला होता.
राष्ट्रपती निवडणुकीनंतर 6 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत जगदीप धनखड हे एनडीएचे उमेदवार होते. तर मार्गेरट अल्वा या विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवत होत्या. निवडणुकीत धनखड यांनी अल्वा यांचा 346 मतांनी पराभव केला.
उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभा आणि राज्यसभाचे खासदार मतदान करतात. लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण 788 खासदार आहेत. मात्र राज्यसभेच्या आठ जागा रिक्त असल्याने 780 खासदारांपैकी 725 खासदारांनी मतदान केले. धनकड यांना 528 मते तर अल्वा यांना 182 मते मिळाली. तर 15 मते रद्द करण्यात आली. निवडणुकीसाठी एकूण 92.94 टक्के मतदान झाले.
जगदीप धनखड यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण चित्तौड गडच्या सैनिक स्कूलमधून घेतले. ते क्रीडाप्रेमी आहेत. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. ते ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.
धनखड यांची राजकीय कारकीर्द
मुळचे जनता दल पक्षाचे असलेले जगदीप धनखड हे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. 1990 मध्ये त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 1991 मध्ये धनखड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगड येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून जुलै 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….