शिंदे गटाचे 22 आमदार शपथविधीला अनुपस्थित…. ; “मातोश्री” चे लक्ष…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार काल झाल्यानंतर पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी पुढे येऊ लागल्या आहेत.अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनी कसे मंत्रीपद मिळवले, मुख्यमंत्र्याचे पुत्रे श्रीकांत शिंदे यांचा कोणासाठी आग्रह होता, ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही अशा बच्चू कडू यांनी कोणत्या भाषेत इशारा दिला, यावर अनेक राजकीय चर्चा घडत आहेत.
त्यातील काही चर्चांचा कानोस घेतला तर शिंदे गटाच्या एका आमदाराने या विस्ताराला आमच्याच गटाचे 22 आमदार अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले. शपथविधीच्या दिवशी हे आमदार नंदनवन बंगल्यावर सकाळी उपस्थित होते. मात्र त्यांनी समारंभाकडे पाठ फिरवली. ठाकरे सरकारमध्ये जे मंत्री होते तेच पुन्हा लाभार्थी झाले आहेत. या मंत्र्यांना गुवाहटीकडे जातानाच बरीच आश्वासने दिली होती. गुवाहटी पोहोचताच ती पूर्ण पण झाली. त्यातील काहींना आपण वगळू, असे शिंदेंनी आमदारांशी बोलताना सांगितले होते. मात्र हेच पुन्हा सारा लाभ मिळवून मंत्री झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांत अस्वस्थता आहे. तसेच अपक्ष आमदारही संतापले आहेत. त्यातूनच इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार अनुपस्थित राहिले, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असेही हा आमदार म्हणाला.
या आमदाराच्या म्हणण्यानुसार 2024 मध्ये आमच्याविरोधात काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार आतापासूनच तयारी करत होता. त्यांना त्यांच्या पक्षाचे नेते भरीव मदत करत होते. हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही बंडाला तयार झालो. वैयक्तिक उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग नव्हता. मात्र आदित्य ठाकरे यांनी गद्दार आणि `मातोश्री`चे दरवाजे बंद असे शब्द उच्चारल्यानंतर वातावरण चिघळले. ठाकरेंना दगा दिल्याचे आमच्याही मनात सलते आहे. पण त्याला पर्याय नव्हता. पण गोष्टी पुढे गेल्या आहेत, असे हा आमदार म्हणाला.
शिंदे गटाचे आमदार अनुपस्थित असल्याचे शिवसेनेतील काही नेत्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्यानंतर तिकडूनही मग काही समजूत घालणारे संदेश पाठविल्याची माहिती रात्री उशिरा या आमदाराने दिली. त्यामुळे सध्यातरी `मातोश्री`चे आहे लक्ष असेच म्हणता येईल. यातून पुढे संवाद सुरू राहणार की नाही, हे मात्र लगेच सांगता येत नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….