विधान परिषद निवडणुकीत सहा काँग्रेसचे आमदारांकडून क्रॉस वोटिंग ; या आमदारांमुळे हंडोरेंचा पराभव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- २० जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्याच सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे हंडोरेंचा पराभव झाला आहे.
काँग्रेसने अंतर्गत चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ज्यांनी क्रॉस व्होटिंग केले त्यापैकी दोन ते तीन आमदार हे मराठवाड्यातील होते. तर दोन आमदार मुंबईचे होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. गुप्त मतदान झाल्याने त्यांची नावे समोर आलेली नाहीत. असे असले तरी त्यांचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे या नेत्याने सांगितले आहे.
चंद्रकांत हंडोरे यांनी मुंबईचे महापौरपद आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्रिपदही भुषवले आहे. हांडोरेंसाठी २९ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. परंतु हंडोरे यांना फक्त २२ मते पडली आणि त्यांचा पराभव झाला. वरिष्ठ नेत्यांकडे या चौकशीचा अहवाल पाठवण्यात आला आहे. हा अहवाल गुप्त असून पक्षातील नेत्यांनाही हा अहवाल दाखवण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांचा सामना भाजपचे प्रसाद लाड यांच्यासोबत होता, भाई जगताप यांना १५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता परंतु त्यांना २० मते मिळाली. म्हणजेच हंडोरे यांची मते भाई जगताप यांच्या पारड्यात पडली.
निवडणुकीनंतर चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली, तसेच ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता.
इकडे विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. जेव्हा विधासभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला तेव्हा काँग्रेसचे ४४ आमदारांपैकी १२ आमदार अनुपस्थित होते. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश होता.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….