मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह २० पैकी आठ मंत्री मराठा समाजाचे ; ओबीसी समाजाचे पाच मंत्री…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. त्या खालोखाल ओबीसी समाजाचे पाच मंत्री आहेत.
दोन ब्राह्मण, अन्य खुल्या प्रवर्गातील एक, तर मुस्लिम, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जैन यांना प्रत्येकी एक प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ओबीसीमधील कुणबी, तेली आणि वंजारी या जातींना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही.
मराठा समाजाच्या मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण आणि शंभुराज देसाई हे आठ जण आहेत. त्यात भाजपचे तीन, तर शिंदे गटाचे पाच जण आहेत. ओबीसी मंत्र्यांमध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, अतुल सावे आणि संजय राठोड (व्हीजेएनटी-ओबीसी) आहेत. त्यात शिंदे गटाचे तीन, तर भाजपचे दोन आहेत.
ब्राह्मण समाजाच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत (कुडाळ देशकर गौड ब्राह्मण) आहेत. सुरेश खाडे अनुसूचित जातीचे तर डॉ.विजयकुमार गावित हे अनुसूचित जमातीचे आहेत. मंगलप्रभात लोढा जैन समाजाचे तर अब्दुल सत्तार हे मुस्लिम आहेत. सुधीर मुनगंटीवार हे आर्यवैश्य समाजाचे (खुला प्रवर्ग) आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….