रामनाथ कोविंद यांचा संसद भवनात निरोप समारंभ ; पंतप्रधान , उपराष्ट्रपती सह सर्व खासदारांची उपस्थिती….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा यांचा निरोप समारंभ काल संध्याकाळी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी , उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू , लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच दोन्ही सभागृहांचे सर्व खासदारही या निरोप समारंभात सहभागी होते. यादरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप दिला. तसेच संसद सदस्यांच्या वतीने राष्ट्रपतींना सन्मानपत्रही दिले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसद सदस्यांनी स्वाक्षरी केलेले ‘स्मृतीचिन्ह’ आणि ‘स्वाक्षरी पुस्तक’ भेट देण्यात आले. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत खासदारांच्या स्वाक्षरीसाठी ‘सिग्नेचर बुक’ ठेवण्यात आले होते.
संसद भवन येथे निरोप समारंभ
देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी १२ जनपथ रोडवरच बंगला देण्यात आला आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे या बंगल्यात अनेक दशकं वास्तव्य होते. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान याने हा बंगला रिकामा केला होता. यादरम्यान बराच वादही झाला.
पीएम मोदींनी दिला निरोप
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी निरोप मेजवानी आयोजित केली. या मेजवानीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही आले. दिल्लीतील हॉटेल अशोका येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे देशभरातील अनेक आदिवासी नेतेही पोहोचले. यासोबतच अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांनीही निरोप समारंभात सहभाग घेतला.
चेस ऑफ गार्ड आयोजित होणार नाही.
द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याच्या तयारीच्या संदर्भात फुल ड्रेस रिहर्सल आयोजित केल्यामुळे आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गार्ड चेंज (Change of Guard Ceremony) सोहळा होणार नाही. विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव करून द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला आहे.