प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पाण्यात जाणाऱ्या त्या दोघांवर फौजदारी कार्यवाही ; बाभुळगाव येथे दोघांना बचाव पथकाने काढले सुखरूप बाहेर ; धोक्याची सुचना दिल्यावर निष्काळजीपणाने बाहेर पडू नये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 18 जुलै :- धोक्याची सुचना देवूनही पाण्याची ठीकाणी जाणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे कोणीही जीवावर बेतेल असे धाडस करू नये व निष्काळजीपणाने बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
बाभुळगाव तालुक्यातील पालोती गावातील दोघेजण आज दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 पर्यंत पुराच्या पाण्यात झाडावर अडकले होते, त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बचाव पथकाने बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढले आहे.
बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने पुराच्या पाण्यात जाऊ नये याबाबत वारंवार आवाहन करूनही पलोती येथील महादेव पवार (वय 55) व मारोती चव्हाण (वय 50) हे पाण्याच्या ठिकाणी गेले होते. त्यामुळे या दोघांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी सुरू केली आहे.
फाेटाेत – बाभुळगाव येथे दोघांना सुखरूप बाहेर काढणारे बचाव पथक….

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….