अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड राळेगाव व कळंब तालुक्यात केली पाहणी……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 18 जुलै :- राळेगाव व कळंब तालुक्यात काल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्याची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनफिल्ड जाऊन अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी केली. या दोन्ही तालुक्यातील सावंगी पेरका, झाडगाव, कात्री, कामठवाडा, या गावातील तसेच कळंब येथील चक्रावर्ती नदीकाठच्या पूर बाधीत नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रामतीर्थ गावातील नदीच्या पाणी पातळीचे अवलोकन करून प्रशासनाला योग्य दक्षता घेण्याबाबत व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी त्यांचेसमवेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे हे देखील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव येथे सर्व तालुका स्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेवून अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पिक विमा साठी जास्तीत जास्त अर्ज घेण्याचे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचे व डायरीया, कॉलरा, मलेरिया, डेंगू होऊ पसरणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला संबंधीत तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…