ई-पिक पाहणी न करताही पीकविमा काढता येईल :- जिल्हाधिकारी ; पिक विमा काढण्यासाठी ई-पिक पाहणीची नोंद सक्तीची नाही ; ३१ जुलै पुर्वी काढा पिकविमा ; १ ऑगस्ट नंतर करा ई-पीक पाहणीची नोंद…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. १७ :- पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पिक पाहणीची नोंद आवश्यक नसल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता 31 जुलै पुर्वी पिकविमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप २०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२२ असा आहे. तर शासनाच्या ई-पीक पाहणी मध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही ०१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होते.
नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणी मध्ये
केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणी मध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र ०१ ऑगस्ट, २०२२ नंतर त्यांनी ई-पीक पाहणी मध्ये आपल्या पिकाची नोंद करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…