सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी पूर्वीच एकनाथ शिंदेंची मोठी खेळी..? ; अशी आहे नवीन कार्यकारणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या घटनापीठासमोर 20 जुलै रोजी होणार आहे.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. यानंतर शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत पक्षप्रमुख पदाचा उल्लेख नाहीये, मात्र इतर पदांची आणि त्यावर नियुक्त नेत्यांची नावं शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेतील अनेक नेत्यांवर कारवाई केली जात असतानाच शिंदे गटाकडून आता ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
शिंदेंकडून नवी कार्यकारिणी जाहीर
शिवसेनेने जारी केलेल्या कार्यकारिणीतील नियुक्त्या पुढीलप्रमाणे-
मुख्य नेता- एकनाथ शिंदे
मुख्य प्रवक्ते- दीपक केसरकर
उपनेते- तानाजी सावंत
उपनेते- यशवंत जाधव
उपनेते- गुलाबराव पाटील
उपनेते- उदय सामंत
दीपक केसरकर काय म्हणाले?
शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटासोबत असल्याची चर्चा आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, मला वाटतं आमच्याबरोबर सगळेच खासदार आहेत. कारण हिंदुत्वाचा विचार आमच्यासोबत आहे. त्यामुळे हाच विचार अधिक व्यापक प्रमाणावर पसरवण्यात आम्ही भूमिका असेल, असं दीपक केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे दिल्लीत..
दरम्यान, महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचावरील सुनावणी येत्या बुधवारी घटनापीठासमोर होणार आहे. यानिमित्त कायदेशीर बाजूंत मार्गदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठी आणि कायदेशीर तज्ज्ञांचं ते मार्गदर्शन घेतील, अशी माहिती आहे.
14 खासदार उद्या फुटणार?
आज राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचे 14 खासदार फुटतील अशा चर्चा होत्या. मात्र प्रत्यक्षात तसं चित्र दिसलं नाही. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही स्पष्ट सांगितलं की, शिवसेनेचे सर्व खासदार आमच्या सोबत आहेत. मात्र राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहे. हे 14 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून नवा गट स्थापन करणार आहेत. या गटाचे संसदेतील गटनेते राहुल शेवाळे असतील. संसदेतील गटनेतेपदी त्यांनी नियुक्ती केली जाईल, अशीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…