मोठी बातमी ; शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका ; “त्या” कामांना दिली स्थगिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात नव्यानं सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारनं विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना पुन्हा एक दणका दिला आहे.
शिंदे सरकारनं 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. यापैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. ही कामे मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आली होती.
विशेष बाब म्हणजे शिंदे सरकारने फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. तर शिवसेना आमदारांनी सूचवलेल्या कामांना मात्र अभय देण्यात आलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार होती. त्यामुळे सत्ता बदल झाल्यानंतर कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, याआधी सुद्धा शिंदे सरकारनं महाविकास आघाडीला दणका दिला होता. 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. तब्बल 13 हजार 340 कोटींचा हा निधी होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागासाठी हा निधी मंजूर केला होता. पण, नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत हा निधी दिला जाणार नाही, असं शिंदे सरकारने स्पष्ट केलं होतं.
शिंदे-ठाकरे एकत्र येणार?
दुसरीकडे शिवसेनेच्या महिला नेत्या दीपाली सय्यद यांनी एक सूचक ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच चर्चा करायला एकत्र येणार हे समजले असे दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…