सांगा साहेब ! बळी घेतल्याशिवाय खड्ड्डे बुजवणार नाही का ? आमदाराची अवस्था असून नसल्यासारखी ; बस स्थानक परिसर खड्डेमय
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महागाव शहराची अवस्था बिकट झाली आहे.शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूस आमंत्रण देणारा ठरू लागला आहे. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या बस स्थानक चौकापासून ते नगरपंचायत पर्यंत डांबरी महामार्गावर फुटभर खड्डे पडले आहे . महागाव शहरातील अत्यंत गंभीर प्रश्नाकडे आमदार नामदेव ससाणे यांनी दुर्लक्ष केल्याने विधानसभा मतदार संघात आमदार असून नसल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक नेतेच याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या खड्यात पावसामुळे पाणी साचत असल्याने वाहन धारकांना अंदाज लागत नाही.कारणास्तव या खड्यांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खड्डे बुजवाण्याबाबत अनेकांनी प्रशासानांशी संपर्क साधला मात्र आश्वासनाची खैराती शिवाय न्याय मिळतच नसल्याने सांगा साहेब ! बळी घेतल्याशिवाय खड्ड्डे बुजवणार नाही का ? अशी तिखट प्रतिक्रिया प्रशासनाविरोधात उमटू लागली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….