मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीचा निधन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे आज निधन झालं आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना गुरुग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्या पत्नी आणि प्रतीक यादव यांच्या आई तसचे भाजप नेत्या नेत्री अपर्णा यावद यांच्या सासू होत्या.
साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मुलायम सिंह यादव यांच्या पहिल्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या आई मालती देवी यांचे 2003 साली निधन झालं होतं. त्यानंतर त्यांनी साधना गुप्ता यांच्याशी दुसरा विवाह केला होता.
गेल्या आठवड्यात साधना गुप्ता यांना फुफ्फुसांचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याना फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. तसेच त्यांना शुगर आणि इतरही त्रास होता. आज त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह गुरुग्रामवरून लखनऊला आणण्यात येत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…