राज्यातील या जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई 09 जुलै :- राज्यातील आज सकाळी अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.
कोयनेच्या भुकंपमापन केंद्रावर 4 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे . भूकंपमापन केंद्रापासून 136 किमी अंतरावर भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानीची अद्याप नोंद नाही. याबाबतचा अधिक तपास सध्या केला जात आहे.
भूकंपामुळे किती ठिकाणी नुकसान झालं याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यानजीक असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. भूकंप झाल्यानंतर कुठे काय घडलं आहे का ?
याची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. सकाळी 6.22 वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकतील विजापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागात सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे