मुख्यमंत्र्यांनी आज स्वीकारला पदभार ; दालनातील बाळासाहेबांचा फोटो चर्चेत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात सत्य नारायणाची पुजा करुन पदभार स्विकारला. मागील १५ दिवसांच्या सत्तानाट्यांनंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र मिळून सरकार स्थापन केलं.
आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारत त्यांनी राज्याचा रीमोट अधिकृतरित्या आपल्या हाती घेतला.
पदभार स्वीकारताना त्यांनी सत्य नारायणाची पुजा केली. या शुभ मुहर्तेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली. विशेष म्हणजे, बाळसाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांच्याही प्रतिमा मुख्यमंत्री दालनात लावण्यात आल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबसाहेब आंबेडकर याशिवाय आनंद दिघे आदी मान्यवरांच्या फोटोला माल्यार्पण केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केल्यानंतर आणि राज्यात सरकार स्थापण केल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यावर आमचं सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरचं सरकार आहे. हे सरकार खरंतर अडीच वर्षांपूर्वी स्थापन व्हायला हवं होतं, अस परखड मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यातील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलेलं आहे. नगरसेवकांमधील शिवसेनेतील मोठा गट शिंदे गटात जाणार असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातले शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….