फेरफारसाठी पैशाची मागणी करणारा व्हिडिओ व्हायरल ; महिला तलाठी तडकाफडकी निलंबित ; असेच अनेक मंडळाधिकारी यांचे कारनामे एसडीओं चौकशी करतील का?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
वाटणीपत्राचा फेरफार घेण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शितल कल्याणकर तलाठी कासोळा असे निलंबित करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे विविध फेरफार प्रलंबित आहेत.तलाठी यांच्याकडून संगणकावर टाकण्यात आलेल्या फेरफटका मंडळाधिकारी “लाच ” घेतल्या शिवाय मान्यता देत नाही.विहित मुदतीनंतरही मंडळाधिकारी फेरफार प्रलंबित ठेवत असल्याने याची सर्व मंडलाधिकारी यांचे संगणकावरील फेरफार नोंदीची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते
समाधान कदम यांनी केली आहे.
बाबुलाल भिक्का जाधव ह्याने त्यांचा मुलगा नामे अभिनंदन बाबुलाल जाधव ह्यास दुय्यम निबंधक कार्यालय महागाव येथून केलेल्या वाटणीपत्राचा फेरफार घेणे करीता तलाठी यांनी एक हजार पाचशे रुपये मागीतले होते. कमी पैसे देतो म्हटले तर तुमचा फेरफार होत नाही. अशी उध्दट वागणूक शेतकऱ्याला देण्यात आली होती. शेतकर्याने पैसे मागत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला. व त्या बाबत माहिती संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात आली होती .परंतु त्यावरही उद्धटपणे वागणूक देण्यात आली . “तुमच्या ने जे होते ते करा माझे कोणी काही करू शकत नाही “. अशी उलट धमकी महिला तलाठ्याने शेतकऱ्याला दिली होती.
पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ शुटींग करून गोकुळ दत्ता राठोड यांनी वरिष्ठांना पाठवला होता. तोच व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झालेला होता.त्यामुळे प्रशासनाची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली.
संबंधित शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली आहे तसेच संबंधित महिला तलाठी पैसे स्वीकारताना चा व्हिडिओ सुद्धा प्राप्त झाला आहे. प्रशासकीय बाब म्हणून शितल कल्याणकर तलाठी कासोळा यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे.
डॉक्टर व्यंकटेश राठोड
उपविभागीय अधिकारी उमरखेड