शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर राज्यसभा निवडणूक न लढविण्याचा छत्रपती संभाजीराजे यांचा निर्णय ; आता मी मोकळा झालोय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :-
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेनं पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे यांनी त्याला नकार दिला. शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता संभाजीराजे काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.
“मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो”
राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “ज्या आमदारांनी ड्राफ्टवर सह्या केल्या, त्या आमदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी. शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच. पण मला कल्पना आहे की यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे”, असं संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….