दिव्यांग व्यक्तींना युनिक ओळखपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा :- जिल्हाधिकारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 9 मे :- दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक युनिक ओळखपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र ऑगस्ट महिन्यापर्यंत उपलबध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
दिव्यांग व्यक्तींना युनिक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आज आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा शल्य चिकित्सक आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी पुढे बोलतांना सांगितले की ज्या दिव्यांग व्यक्तींकडे अद्याप दिव्यांग प्रमाणपत्र नाही त्यांचेसाठी नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांची यादी निश्चित करून त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळण्यासाठी माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच उपजिल्हा रूग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ठरवून दिलेल्या दिवशी तपासणी करण्यासाठी मदत करावी. यासाठी समाज कल्याण विभागाने पाठपुरावा करावा व युनिक ओळखपत्र देण्यासाठी आवश्यकतेनुसार ग्रामीण भागात शिबीरे घेण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या. शालेय विद्यार्थ्यांना देखील तातडीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गुरूवार दिवस ठरवून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ग्रामीण भागात एस.टी. बसेस सुरू झाल्या आहेत, त्यात दिव्यांग व्यक्तींना भाडे सवलत मिळण्यासाठी आगार प्रमुखांना कळविण्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…