नगर परिषद निवडणूक ; सुधारित प्रभाग रचनेवर आक्षेप आमंत्रित…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 9 मे :- यवतमाळ जिल्हयातील नगरपरिषद यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी आणि आर्णी च्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीकरिता राज्य निवडणूक आयोगाचे सुचनेनुसार यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराची विभागणी नविन प्रभागात केली असून त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सिमा प्रदर्शित केलेल्या प्रारूप रचनेचा मसुदा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर तसेच उपरोक्त संबंधीत नगरपरिषद कार्यालयाचे सूचना फलकावर दिनांक 10 मार्च 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.
राज्य निवडणूक आयोग यांचे सूचनेनुसार उक्त नगरपरिषद क्षेत्रातील ज्या रहिवाशांना या संबंधात काही हरकती व सुचना दाखल करावयाच्या असतील त्यांनी संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचेकडे नगरपरिषद कार्यालय येथे दिनांक 10 मे 14 मे 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत कारणासहित लेखी स्वरूपात सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. ज्या कोणत्याही व्यक्तीचे लेखी हरकती व सुचना संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचेकडे नगरपरिषद कार्यालय येथे प्राप्त होतील, त्यावर 23 मे 2022 पर्यंत सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…