राणा दांपत्याचे दिल्लीत जंगी स्वागत……

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिल्ली :– हनुमान चालीसेच्या मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना तुरुंगात जावे लागले होते. तब्बला 13 दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
त्यानंतर मानेच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेतले. तेथे त्यांचे MIR ही करण्यात आले. रुग्णालयातून घरी पतताच नवनीत राणा पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली. त्यानंतर आज राणा दाम्पत्य भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्याच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत.
तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना प्रभुराम मूर्तीही भेट देण्यात आली. तर जय श्रीरामच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. याबरोबरच आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत अशी नारेबाजीही कार्यकर्त्यांनी यावेळी केली. आमचा धर्म जे आम्हा शिकवतो ते आम्ही करत आहोत.आणि भगवंताला माननारे सर्व लोक इथे आमच्या स्वागताला आलेत अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.