शिवसेनेत घूसपुस ; अनिल परब , उदय सामंत यांच्यावर पदाधिकारी नाराज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अनेक काळापासून शिवसेनेमध्ये धुसफूस सुरु होती. कोकणातील नेते परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारभारावर स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत.
यापार्श्वभूमीवर ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यंमत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनिल परब, उदय सामंत, एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांची उपस्थिती आहे….
कोकण किंवा रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी इथं घडत आहेत, त्यावरुन अशा प्रकारची बैठक होऊ शकते याची कल्पना येत होती. पालकमंत्री अनिल परब हे केवळ जिल्ह्यात झेंडावंदना पुरते येतात. निधी वाटपात त्यांचा दुजाभाव असतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क नसतो, अशा तक्रारी पदाधिकाऱ्यांमध्ये आहेत.
त्याचबरोबर उदय सामंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना इथं कसा पाठिंबा देतात आणि निवडून आणतात याची माहिती देणारा खुद्द सामंत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळं असं असेल तर इथं आम्ही करायचं काय? असं शिवेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, चार तास ही बैठक सुरु होती, यामध्ये अनिल परब आणि उदय सामंत यांच्याविरोधात नाराजी दिसून आली. येत्या काळात कोकणात शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. याद्वारे कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सागण्यात येत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….