नवीन बंधारे मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार :- पालकमंत्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 30 एप्रिल, :- जिल्ह्यातील ज्या नगरपालीकांनी नवीन बंधारे घेण्यासाठी शासनाकडे अद्याप प्रस्ताव पाठवले नसतील त्यांनी आजच माझ्याकडे प्रस्तावाची प्रत सादर केल्यास मी सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत ते प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल, असे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.
नगरपालीका क्षेत्रातील विकास कामांचा आढावा आज पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगरपालीका प्रशासन अधिकारी धीरज गोहोड, तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालीका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत नगरपालीका व नगरपंचायतींना काय अडचणी आहेत याबाबत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सर्व मुख्याधिकारी यांना विचारणा करून नगरपालीका क्षेत्रातील अडचणींची माहिती जाणून घेतली. तसेच पालीका क्षेत्रातील सर्व नागरिकांना पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना करण्याचे सांगितले.
मागील वर्षात जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालीकांनी विकास कामांचे प्रस्ताव उशीरा सादर केल्याने कामे सुरू करण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. यावर्षी मात्र सर्व नगरपालीका व नगरपंचायतींनी जिल्हा विकास निधीतून करावयच्या विकास कामांचे प्रस्ताव मे महिण्याच्या आत सादर करावे व मंजूर झालेली कामे जुन-जुलै पर्यंत पुर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी सर्व नगरपालीकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री यांनी झरी जामणी या दुर्गम भागात विकासाची काय कामे घेता येईल याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली. झरी येथे घरोघरी नळ देण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याचे तसेच स्मशानभुमीचे बांधकामासाठी अडचण ठरणाऱ्या विद्युत वाहीनीचे खांब स्थालांतरीत करण्याचेही त्यांनी सूचविले. सर्व नगरपालीका क्षेत्रात नगरोत्थान मधील कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला सर्व नगरपालीका व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….