“तर आम्ही अंगावर केसेस लावून घ्यायला तयार” ; अमित ठाकरेंचं मोठं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत असून यासाठी मनसैनिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे सध्या पुण्यात पोहोचले असून थोड्याचवेळात ते औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे कालच औरंगाबादमध्ये पोहोचले होते. आज सकाळी अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी अमित ठाकरे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळालेली असली तरी पोलिसांकडून अनेक अटी आणि नियम घालून देण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या ७५ डेसिबलच्या मर्यादेचं पालन कसं होणार? असं विचारलं असता अमित ठाकरे यांनी आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार आहोत, असं अमित ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरे यांनी सभास्थळी भेट दिल्यानंतर व्यासपीठ, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठीची आसनव्यवस्था, पत्रकार कक्ष आणि पोलिसांसाठी करण्यासाठी व्यवस्था अशी सर्वबाबींची माहिती जाणून घेतली. “काही पक्षप्रवेश होणार होते त्यामुळे मी कालच औरंगाबादमध्ये दाखल झालो होतो. आज सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. तयारी खूप उत्तम झालेली असून सभेची प्रचंड उत्सुकता सर्वांमध्ये आहेत. उद्याची सभा जोरदार होईल यात शंका नाही”, असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….