शिवसेनेचे आर्णीत आक्रोश रॅली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आर्णी :- यवतमाळ- जिल्ह्यात नाफेड मार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बारदाना उपलब्ध होत नसल्याने व चना साठवणुकीसाठी गोदाम नाही.
प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आर्णी येथे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांच्यासह शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रैली काढली.
महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा असे आर्जव शेतकऱ्यांनी केले व प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले. ह्या सायकल रैलीद्वारे शेतकऱ्यांनी नाफेड च्या केंद्रावर धडक देत त्याठिकाणी सामूहिक मारोती स्तोत्र पठण केले.
नाफेड चना खरेदी करीत नसल्याने शेतकर्यांना हमीभाव मिळत नसून त्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नाफेडच्या केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्या अन्यथा शिवसेना अक्षय तृतीयेनंतर हिसका आंदोलन करेल असा ईशारा बाळासाहेब मुनगीनवार यांनी दिला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…