महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग ; उद्या शिवसेनेचे सर्व खासदारांची बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन विषयांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. असं असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे.
सर्व खासदारांना या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही बैठक शुक्रवारी सकाळी पार पडणार आहे. संबंधित बैठक वर्षा बंगल्यावर होणार की मातोश्रीवर याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही.
राज्यात सध्या स्फोटक राजकीय घडामोडी घडत असताना, शिवसेनेनं अशाप्रकारची बैठक बोलावली आहे. त्यामुळे अनेकांचं याकडे लक्ष लागलं आहे. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, मशिदीवरील भोंगे, मनसे आंदोलन, राणा दाम्पत्य प्रकरण आणि आगामी महापालिका निवडणुका आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…