येत्या 4 ते 5 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा ; विदर्भात अलर्ट जारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- देशात येत्या चार -पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविलाय. विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेची झळ पोहोचणार असून विदर्भाला देखील अलर्ट देण्यात आल्याची माहीती, भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सखा सानप यांनी दिलीय.
वर्धा, चंद्रपूर,अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने हा अलर्ट नुकताच जारी केलाय. 28 एप्रिल ते 2 मे पर्यंत अलर्ट देण्यात आलाय. या भागातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडु नये, तसेच सतत पाणी, पन्ह ORS, ताक अशा गोष्टींनी स्वत:ला हायड्रेट ठेवावे असा सल्लाही देण्यात आलाय.
महाराष्ट्रात एप्रिलच्या सुरुवातीला पारा ४४ अंस सेल्सिअस पर्यंत गेला होता. आता उत्तर भारत, मध्य भारतात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट असून उत्तर आणि मध्य भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याची माहीती डॉ सानप यांनी दिलीय.
महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान ब्रम्हपूरी येथे 45.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. त्यापाठोपाठ अकोला आणि नागपूर 44.8 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 44.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीय. मध्य महाराष्ट्रात मालेगाव- 43.2, सोलापूर- 43 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेलेय. वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटांच्या प्रमाणात वाढ झाली असून हे हवामान बदलाचे संकेत असल्याची शक्यता वर्तविली जातेय

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…