देशमुखांना क्लीनचीट…? ; चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता.
या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगाचा अहवाल मंगळवारी (ता. 26) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
चांदीवाल आयोगाची चौकशी मागील महिन्यात पूर्ण झाली आहे. सुमारे 200 पानांचा हा अहवाल आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. यावेळी गृहमंत्री वळसे पाटीलही उपस्थित होते. आयोगाने आपल्या अहवालात देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचे समजते. परमबीरसिंह यांनी केलेले आरोप कळते-समजतेच्या आधारावर असल्याचा निष्कर्षही आयोगाने काढला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकार या अहवालावरून काय पावले टाकणार हे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे प्रकरण…?
परमबीर सिंग यांनी मागीलवर्षी देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यांनी आरोपांचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने समितीची स्थापना केली होती. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती देशमुखांवरील आरोपांची चौकशी करीत होती. नंतर या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले.
आयोगाकडून देशमुखांसह परमबीरसिंग आणि मुंबई पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याची चौकशी केली. तिघांनाही आयोगासमोर समोरासमोर आणण्यात आले होते. देशमुख व वाझे यांची समोरासमोरच झाडाझडती घेण्यात आली. देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआयकडूनही केली जात आहे. ईडीकडून देशमुखांवर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….