आता पुन्हा महाराष्ट्रात मास्कसक्ती होणार….? ; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगिलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशात कोरोना व्हायरसने आणखी एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीसह काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर अनेक शहरात पुन्हा मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कर्नाटक प्रशासनाने राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही मास्कसक्ती होणार का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मास्कसक्तीचे स्पष्टच संकेत दिले आहेत.
कोरोनामुळे महाराष्ट्राची चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात नसलेली मास्क बंदी पुन्हा एकदा होऊ शकते, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत बेस्टच्या कार्यक्रमात बोलताना राज्यात परत मास्क वापरावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, देशातील अनेक भागात कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरू केल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…