मोठी बातमी ; राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यात कोरोनाची लाट जवळपास संपली आहे. सर्व विद्यापीठातील परीक्षा (exam) ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे सोमवारी त्यांनी ऑनलाइन बैठकीत सर्व विद्यापीठांशी संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यात आतापर्यंत कोरोनाची लाट होती. मात्र, दीड महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महाविद्यालये ऑफलाइन सुरू असताना विद्यापीठांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.
याबाबत विद्यार्थी संघटनाही आक्रमक असल्याचे दिसून आले. त्यातून काही विद्यापीठाद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. मात्र, सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा (exam) आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही माहिती देण्यासाठी ते पत्रकार परिषदही घेणार असल्याचे समजते.

नागपूर विद्यापीठाने दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन परीक्षा (exam) घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला होता. आता ऑफलाइन (offline) परीक्षा होणार असल्याने विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यात संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या विरोधात
कोरोनाची लाट जवळपास संपल्याने सर्व महाविद्यालये आणि शाळा पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षासुद्धा ऑफलाइन घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यापूर्वीही परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत उदय सामंत यांनी सूचक विधान केले होते. त्यानुसार त्यांनी कुलगुरूंसोबत घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निर्णय घेतला. परंतु, विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या विरोधात आहेत. त्यासाठी काही ठिकाणी आंदोलनेसुद्धा झाली आहेत. उदय सामंत यांच्या आजच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….