हार्दिक पटेल यांचं भाजपमध्ये प्रवेशबाबत प्रतिक्रिया…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सुरत :- गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पण आता या सर्व चर्चांवर स्वतः हार्दिक पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी कामगारांच्या हितासाठी लढत आलोय. नाराजी प्रत्येक कुटुंबात असते, पण आपण सामर्थ्यवान बनायला हवं,” अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे.
‘मी राहुल-प्रियंकांवर नाराज नाही’
आज गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे कौतुक करण्याच्या प्रश्नावर म्हटले की, “मी जो बायडेन यांचेही कौतुक केले होते, त्याचा अर्थ मी त्यांच्या पक्षात सामील होतोय, असा होतो का? मी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यावर नाराज नाही. मी राज्य नेतृत्वावर नाराज आहे. मी अस्वस्थ, कारण निवडणुका येत आहेत आणि अशा वेळी प्रामाणिक आणि कणखर लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे,” असेही पटेल म्हणाले.

‘अफवा पसरवू नका’
ते पुढे म्हणतात की, “पक्ष मजबूत करण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे. निवडणुकीचा काळ आहे, गावोगावी आणि शहरांमध्ये जाऊन पक्षाच्या नेत्यांना मेहनत करावी लागेल. प्रत्येक कुटुंबात नाराजी असते, प्रश्न निर्माण होतात. पण, त्याचा एकच अर्थ लावायचा नसतो. मी यापूर्वीही स्पष्ट केले होते, अफवा पसरवू नका,” असेही ते म्हणाले.
यावर्षी गुजरातमध्ये निवडणूक
गुजरातमध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार नेते नरेश पटेल यांना पक्षात सामावून घेण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे हार्दिक नाराज असल्याचे बोलले जात आहे. नरेश पटेल पक्षात सामील झाल्यास पाटीदार समाजाचा नेता म्हणून हार्दिकचा प्रभाव संपुष्टात येईल, असे अनेकांचे मत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….