राणा दाम्पत्य रात्रभर पोलीस ठाण्यात ; रात्रभर काय ही स्थिती होती , नवनीत राणांनी सांगितले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राणा विरुद्ध सेना वाद आणखी पेटला आहे. मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना काल खार पोलिसांनी अटक केली.
समाजात तेढ निर्माण करणारी विधानं केल्यानं राणा दाम्पत्याला अटक झाली. त्यामुळे कालची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस कोठडीत काढावी लागली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असं आव्हान राणा दाम्पत्यानं दिलं होतं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. समाजात तणाव निर्माण करणारी वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांनी काल राणा दाम्पत्याला अटक केली. त्यामुळे कालची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस कोठडीत काढावी लागली.
काल रात्री उशिरा राणा दाम्पत्याला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. राणा दाम्पत्यानं पोलीस कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं. नवनीत राणांकडून ही माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे यापुढे राणा विरुद्ध सेना वाद वाढण्याची शक्यता आहे.
…मग पाकिस्तानात हनुमान चालिसा म्हणायची का…? – फडणवीस….
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हटली जाणार नाही, तर मग पाकिस्तानात म्हटली जाणार का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. एका महिलेला हे सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवण्यात आले. राज्यात झुंडशाहीचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी झुंडशाही सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…