शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले ; “आम्ही त्यांना सोडणार नाही” ; शिवसैनिक आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :– राणा दाम्पत्याच्या खारमधील (khar) इमारतीत शिवसैनिक (shivsainik) घुसले आहेत.
सकाळपासून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्यांनी घराबाहेर पडण्याची वेळ दिली होती. पण त्याचवेळेस शिवसैनिकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मातोश्रीच्या (matoshree) बाहेर मध्यरात्रीपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रीपासून शिवसैनिक राणा दाम्पत्याची वाट पाहत आहे.
मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा आम्ही वाचणार
आज या ठिकाणी पवनपुत्र हनुमान, रामाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या शांतीसाठी महाराष्ट्राला लागलेला शनी दूर करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. शनिवारच्या दिवशी आम्ही इथे आलो होतो. मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा आम्ही वाचणार आहे. शनिवार हा मारुतीराया दिवस आहे. याच दिवशी हा शनी महाराष्ट्राला लागला. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली पाहिजे. शांती नांदली पाहिजे हा आमचा हेतू आहे. त्याला हा विरोध होतोय मला थांबवण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. हे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक नाहीत. पोलीस आम्हाला दाखवत आहेत. शिवसैनिकांना आमच्या घराबाहेर आणून आमच्यावर दादागिरी करत आहेत. राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिलेत. आम्हाला धमकावण्याचा आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. भगवंताला प्रार्थना करतो या सगळ्यांना बुद्धी येवो. बाळासाहेबांच्या विचारांवर या सगळ्यांनी चालावं असं मी आवाहन करतो. यांचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार, पठण करणार.. पण पोलीस आम्हाला थांबवत आहेत अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…