म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं :- राऊतांचा फडणवीसांवर टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासंदर्भात नागपूरचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला.
या टीकेला राऊत यांनी जाहीर सभेमध्ये फडणवीसांना टोला लगावला आहे. “नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, असं फडणवीस यांनी राऊत यांच्या दौऱ्याबद्दल म्हटलं होतं. पण याच मुद्द्यावरुन राऊत यांनी शाब्दिक चिमटा काढत फडणवीस यांना सुबुद्धी न आल्याने त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं असा टोला लगावलाय.
नागपूरमधील जाहीर सभेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी, “दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं,” असं उत्तर फडणवीस यांच्या टीकेला दिलं. “जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे. शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे ही सुबुद्धी आली असती तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय,” असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय.
या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “ते बरोबर बोलले आहेत, त्यांना सुबुद्धीचं अजीर्ण झाल्यामुळे थोडी सुबुद्धी जर महाराष्ट्रात त्यांच्या लोकांना वाटली तर महाराष्ट्र शांत राहील. आम्ही या गोष्टी त्यांना सांगू. त्यांना सुबुद्धीचं अजीर्ण झालेलं आहे, असं वाटतं,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
तसेच, “नागपुरला महत्व आहेच, आमची उपराजधानी आहे आणि नागपूरकरांचं आमच्यावर प्रेम वाढत चाललय. बरेचसे नागपूरकर हल्ली मुंबईत असतात, त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवला.” असंही राऊत म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….