आमदार रवी राणा यांना मोठा धक्का ; युवा स्वाभिमान संघटनेचे ३५ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- मशिंदीवरील भोंग्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा नुकताच दिला होता.
त्यानंतर शिवनेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. रवी राणा यांच्या घरासमोर मोर्चा काढून शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेतील मुस्लीम कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे युवा स्वाभिमानच्या अल्पसंख्यांक सेलच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती युवा स्वाभिमानचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अयुब खान (Ayub Khan) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे.
पत्रकार परिषदेत अयुब खान म्हणाले की, राणा दाम्पत्य केवळ आणि केवळ भाजप समर्पीत भाषा करीत आहे. राणा यांच्या मतदार संघात विकासकामे होत नाहीत. भोंगे द्यायचे तर सर्वधर्मीय द्यायला हवे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानीची विचारधारा बदलली आहे. सध्या भोंगा व हनुमान चालीसाचा मुद्दा ते हाताळत आहेत, हे काम त्यांच नाही त्यांनी विकास कामांकडे दुर्लक्ष केलं. अमरावती जिल्ह्यात व त्यांच्या बडनेरा मतदार संघात विकासकामे झाली नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर आम्ही विरोध करत आहोत. मुस्लिम समाजामध्ये नाराजी असल्याने आह्मी राजीनामा देत आहोत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..