फळबाग लागवड वाढवा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झरी-जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद ; पोकरा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ; झरी जामणी येथे आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन ; संत्राबाग, शेडनेट, कलींगड लागवड, व सोयाबीन बीयाण्यांची केली पाहणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 20 एप्रिल, :- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी आज झरी जामणी तालुक्यात सालेभट्टी, दुर्गापूर मार्गी, जामणी, शिबला तसेच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख व रुंझा येथे भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रंसगी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, निवासी नायब तहसिलदार महेश रामगुंडे व अशोक ब्राम्हणवाडे उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट स्थापन करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत अवजारे बँक, गोडाऊन, दाल मिल, अन्न प्रक्रिया केंद्र, औषधी वनस्पती प्रक्रीया केंद्र यांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. त्यांनी तहसिल कार्यालय येथे विविध विभागांची आढावा बैठक घेतली. तसेच शिबला येथील तलाठी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.

जिल्हाधिकारी यांनी मार्की बु. येथील संत्रा फळबाग शेती, सालेभट्टी व दुर्गापूर येथील नेटशेड मधील रोपवाटिकेला भेट देवून पाहणी केली. यावेळी कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत जनावरांसाठी पशुधन वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांकडील लागवडीसाठीच्या सोयाबीन बियांण्यांची तपासणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी यांनी पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथे रिसोर्स बँकेतील प्रयोगशील शेतकरी प्रकाश उप्पलवार यांचे शेतात भेट देवून कलींगड लागवडची पाहणी केली. तसेच रूंझा येथे पोकरा योजनेअंतर्गत तीन विहिरींचे भूमीपूजन व शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य गोडावूनचे उद्घाटनही जिल्हाधिकारी येडगे यांचे हस्ते करण्यात आले.
तत्पुर्वी जिल्हाधिकारी येडगे यांनी झरि तालुक्यांतील आरोग्य मेळाव्याला भेट देवून मार्गदर्शन केले. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार वामन कासावार, तसेच तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..