आता 22 एप्रिल रोजी ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसाचे वाचण करणार :- राणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती, 20 एप्रिल :- आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे अमरावतीतील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीस म्हणण्यासाठी अखेर तारीख जाहीर केली आहे.
22 एप्रिलला आपण मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला. आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडलेला आहे. त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालीसाचे वाचन करावे अन्यथा मी व नवनीत राणा ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालीसाचे वाचन करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला होता.
रवी राणा यांच्या इशाऱ्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. (बँकेत Fixed Deposit करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या) आता 22 एप्रिल रोजी ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसाचे वाचण करणार आहोत. मुंबईसाठी तिकीट बुक केल्याची माहिती रवी राणा यांनी दिली आहे. (’26 एप्रिलला माझं लग्न आहे, पळवून ने’; 10 रु.च्या नोटेवर BFसाठी GFचा मेसेज VIRAL) दरम्यान, या प्रकरणावरून संतप्त झालेले शिवसैनिक हे राणा यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत.
तसेच त्याठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करणार आहे. राणा यांची मातोश्रीवर जाण्याची हिंमत नाही. त्यांनी आधी अमरावतीच्या शिवसैनिकांना ऐकून घ्यावे, असा इशाराही अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिला आहे. तर या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..