बालकांच्या शारिरीक व मानसिक विकासासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे ; 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना 25 एप्रिल रोजी देणार जंतनाशक गोळ्या ; सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जंतनाशकाचा डोज ; औषधाचा कोणतेही दुष्परिणाम नाही ; औषध देण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता नाही…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 19 एप्रिल, :- लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्ताक्षयाचा आजार कमी होवून आरोग्यात सुधारणा होते व बालकांचा शारिरीक व मानसिक विकास होवून अन्य संसर्गांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढत. त्यामुळे येत्या 25 तारखेला 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना जंतनाशकाचे औषध देवून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.
येत्या 25 एप्रिल रोजी शासकीय व खाजगी अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात तसेच शाळाबाह्य मुलांना समुदाय स्तरावर अल्बेंडाझोल ही जंतनाशक गोळी देण्यात यावी. या दिवशी सर्व मुले शाळेत उपस्थित राहीतील याची दक्षता घ्यावी. अनुपस्थित असणाऱ्या किंवा आजारपणामुळे किंवा अन्य कारणामुळे हे औषध देण्यात न आल्यास 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मॉप-अप दिनी ते शाळा महाविद्यालयात व घरोघरी जावून देण्यात यावे. हे औषध बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी शासनामार्फत मोफत देण्यात येते. याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने शासकीय किंवा खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशकाचे औषध देण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जंतामुळे होणारे त्रास व औषधाचे परिणाम व महत्व पालकांना पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
बैठकीला डॉ. किशोरी जोशी-केळापुरे, अनिल शेंडगे, डॉ. प्रिती दुधे, डॉ. संदिप भटकर, वैशाली चोरमले, किरण ठाकरे, सचिन बोपाने, जलालुद्दिन गिलाणी, प्रशांत पाटील तसेच आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..