राज्यपालांनी 6 आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं “ते” पत्र बनावट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपालांनी 6 आमदारांची नावं सुचवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पत्र बनावट असल्याचा राजभवनकडून खुलासा करण्यात आला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं पत्र बनावट असल्याचं समोर आले आहे. राजभवनानं ‘झी 24 तास’ला याबाबत माहिती दिलीय. 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या 6 नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र सप्टेंबर 2020 सालचे असल्याचं या पत्रात लिहिण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावांची यादी दिली होती. मात्र, अद्याप या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिलेली नाही. दरम्यान, आज एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्राबाबत राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे. ‘ते’ पत्र बनावट आहे. राज्यपालांकडून 12 पैकी 6 आमदारांची नावे दिल्याचे या पत्रात म्हटले होते. परंतु तसे काहीही नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले यात पत्रात काही नावे सूचविण्यात आली आहेत. यामध्ये वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबूराव कोकाटे (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ ( सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांचा समावेश आहे.
या सहा जणांची शिफारस केली आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हे पत्र कोणी सोशल मीडियावर फिरवले. या पत्रामागे कोणाचा हात आहे, आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..