देशात पुन्हा कोरोना पसरतोय ; दोन हजार नवे रुग्ण आढळले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कोरोना आता नावापुरता शिल्लक आहे अशा थाटात सर्वत्र गर्दी करून वावरणाऱ्या नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. देशात दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून, गेल्या चोवीस तासांत नवे २१८३ नवे रुग्ण आढळले आहेत.
उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले आहे.
– उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ११५४२वर आली आहे. गेल्या चोवीस तासांत २१४ जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेश –
नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर)मधील गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत हे सहा व लखनऊ अशा ७ जिल्ह्यांत मास्क वापरणे सरकारने सोमवारपासून बंधनकारक केले.
हरयाणा –
गुरुग्राम, फरिदाबाद, सोनिपत, झज्जर या जिल्ह्यांमध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. सोमवारी २३४ नवे रुग्ण आढळले.
९०% काेराेना रुग्णवाढ एकाच दिवसात
– देशात १६ एप्रिलपेक्षा १७ एप्रिलला कोरो ना रुग्णांच्या संख्येत सुमारे ९०% वाढ झाली.
– याच प्रमाणात रुग्ण संख्या वाढत राहिली तर शिथिल केलेले कोरोना निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील अशी चिन्हे आहेत. केंद्र व राज्य सरकारे कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
ओमायक्रॉनने मुलांच्या आरोग्याला धोका
– ओमायक्रॉनमुळे लहान मुलांमध्ये श्वसननलिकेच्या वरच्या भागातील संसर्गाचे (यूएआय) विकार उद्भवू शकतात.
– त्यामुळे त्यांना हृदयविकार, तसेच इतर आजारांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे असे कोलोरॅडो विद्यापीठ, स्टोनी ब्रूक विद्यापीठाने केलेल्या संयुक्त पाहणीत आढळून आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..