दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची :- अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काल राजधानी दिल्लीच्या जहांगीरपुरी या भागात हनुमान जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक केली गेली. यानंतर वादाने हिंसक वळण घेतले होते. काही पोलीस कर्मचारी जखमी झाले.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जहांगीरपूर येथे आरएएफचे दोन तुकडी तैनात केली आहे. या हिंसेच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्याशी संवाद साधला.
या घटनेवर अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीचा मी निषेध करतो, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. सगळ्या लोकांना अपील आहे की ते एकमेकांचा हात धरून शांती राखून ठेवावी. शांती शिवाय देश प्रगती करू शकत नाही. कायदा सुव्यवस्था राखणे ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने दिल्लीत शांतता राखून ठेवायला हवे. ”
कालच्या या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस आणि जवानांच्या दल हे शांतता राखण्याचे काम पार पडत आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!