दारू पिऊन गुरुद्वारेत प्रवेश ; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंदीगड :- भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याविरोधात पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली.
सीएम मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारामध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी पंजाबच्या पोलिस महासंचालकांना त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती केली.
भाजप नेत्याने ट्विटरवर तक्रारीचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि म्हटले, “पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विरोधात मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारा दमदमा साहिबमध्ये प्रवेश केल्याबद्दल पोलिस तक्रार दाखल केली आहे. मी डीजीपी पंजाब आणि राज्य पोलिसांना माझ्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती करतो.

याआधी शुक्रवारी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत सिंग मान यांनी देशभरात 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या बैसाखीच्या मुहूर्तावर मद्यधुंद अवस्थेत तख्त दमदमा साहिबमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला होता. त्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही समितीने केली होती.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….