मातोश्री समोर शिवसैनिक एकवटले…. ; राणांविरोधात घोषणाबाजी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- रवी राणा यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार असल्याचं म्हटलं होतं. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे.
आज सकाळी शिवसैनिक मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. यामध्ये मुस्लिम शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली, असं यावेळी शिवसैनिकांनी म्हटले आहे. भाजप हिंदुत्व, भोंग्यांचे राजकारण करत आहे, अशी टीकाही मुस्लिम शिवसैनिकांनी केली. रवी राणा यांनी मुंबईत येऊन दाखवावं असंही शिवसैनिक म्हणाले.
दरम्यान याबाबत खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विसरले आहेत. आम्ही हनुमान चालिसा मातोश्रीवर व्हायला हवी, असं म्हणत होतो. आमची काय त्यांच्याशी दुष्मनी नाहीये. तरीही शिवसेनेनं आम्हाला दिवस आणि वेळ सांगावी, आम्ही तिथे जरूर येऊ. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
अंबानींच्या घराबाहेर जीलेटीन सापडल्यानंतर एवढी तयारी केली असती तर बरं झालं असतं. शिवसैनिकांनी मातोश्रीच्या आत जाऊन उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल विचारावं, असं राणा यांनी म्हटलंय. एवढी शिवसैनिकांनी स्वत: तारीख आणि वेळ ठरवावी. मी मातोश्रीवर येईन, असं राणा म्हणाल्या.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..