7 नाही तर 4 फेरे घेवूनच आलिया बनली रणबीरची पत्नी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुचर्चित ठरलेला लग्नसोहळा अखेर 14 एप्रिलला संपन्न झाला आहे.
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे हा लग्नसोहळा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंजाबी पद्धतीनुसार आलिया आणि रबणीरने लग्नगाठ बांधली. पण या लग्ना दोघांनी सात नाही तर केवळ चार फेरे घेतले.. होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आलिया-रणबीरने लग्नाची एक परंपरा बदलली आणि सात फेरे घेतले नाहीत तर फक्त चार फेरे घेतले. आलियाचा भाऊ राहुल भट्टने याबाबत इंडिया टुडेला सांगितले आहे, तसेच या कपलने असे करण्यामागचे कारण सांगितले आहे.
वेबसाइटशी बोलताना राहुल भट्ट म्हणाला, ‘रणबीर-आलियाने त्यांच्या लग्नात 7 नव्हे 4 फेऱ्या मारल्या आहेत. त्यांच्या लग्नात खास पंडित होते. हे पंडित अनेक वर्षांपासून कपूर कुटुंबासोबत आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरीचे महत्त्व त्यांनी सांगितले. एक घडते धर्मासाठी, एक घडते मुलांसाठी… त्यामुळे हे सर्व खरोखरच आकर्षक होते. मी अशा एका घरातून येतो जिथे अनेक धर्माचे लोक राहतात.
रिसेप्शन कधी होणार ?
लग्नाचे सर्व विधी संपन्न झाल्यावर नीतू कपूर मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आले. त्याने पापाराझींचे आभार मानले. याशिवाय पापाराझींनी त्यांना रिसेप्शनबद्दल विचारले असता, त्याने रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट ते म्हणाला की सगळं झालं आता तू आरामात घरी जाऊन झोपा.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..