राज ठाकरेंची काल भुजबळावर टीका ; आज पंकज भुजबळ शिवतीर्थावर दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंनी काही दिवसांपूर्वीच राज यांची भेट घेतली. त्यानंतर आज कृपाशंकर सिंह राज यांच्या भेटीला पोहोचले. सिंह यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री पंकज भुजबळ शिवतीर्थावर दाखल झाले. या भेटीची सध्या जोरदार चर्चा आहे.
राज यांची ठाण्यात काल जाहीर सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज यांच्या रडारवर होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यावर राज यांनी सडकून टीका केली. ‘पंतप्रधान मोदींविरोधात बोलल्यानं मला तरुंगात टाकण्यात आलं. पण तरीही मी माझा ट्रॅक बदलला नाही, असं भुजबळ म्हणाले. तुम्हाला तुरुंगवास मोदींवर टीका केल्यानं नव्हे, तर तुमच्या संस्थेत झालेल्या गैरकारभारांमुळे घडला,’ असं राज ठाकरे म्हणाले.
कालच राज यांनी छगन भुजबळांवर टीका केली असताना आज भुजबळ यांचे पुत्र पंकज शिवतीर्थावर दाखल झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंकज भुजबळ सपत्नीक शिवतीर्थावर पोहोचले. राज ठाकरे गेल्याच आठवड्यात आजोबा झाले. राज यांचे पुत्र अमित ठाकरेंना मुलगा झाला. त्याला पाहण्यासाठी पंकज भुजबळ शिवतीर्थावर गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पंकज दोनवेळा राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..