राज ठाकरेंच्या ठाणे उत्तर मधील सभेतील 10 महत्वाचे मुद्दे……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. आजच्या भाषणात राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलं जर 3 मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय, आजच्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवरही राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.
जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.
शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातील, अशी शरद पवारांना भीती : राज ठाकरे
महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे. शरद पवार कोणत्याही सभेत छत्रपती शिवाजींचे नाव घेत नाही. ते काय शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार हे नास्तिक आहेत. शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातील, अशी भीती शरद पवारांना आहे. घराघरात शिवाजी महाराजांना पोहचवण्याचे काम बाबासाहेब पुरंदरेने केले आहे. बाबासाहेब पुरंदरे हे पवारांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे.
निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात येत आहे : राज ठाकरे
मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. पण त्याचं पुढे झालं काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकरणासाठी वापरण्यात आला. आता निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात येत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
अजित पवारांना ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून उत्तर
मशिदीच्या भोंग्यावर मी या आधी देखील बोललो आहे. पण त्याचा झाले असे, सकाळच्या शपथविधीनंतर पवारांनी आवाज काढला. त्यानंतर अजित पवारांना तीन, चार महिने ऐकू येत नव्हते. हे अजित पवारांना ऐकू आले नाही. लॉकडाऊननंतर कान साफ झाले, त्यामुळे अजित पवारांना गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला.
सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे : राज ठाकरे
अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंनाा कसं जमलं? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे.
यांची प्रॉपर्टी जप्त केली तर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिव्या दिल्या : राज ठाकरे
पत्रकार परिषदेत एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक अतिशय खालच्या दर्जेची भाषा वापरतो. यांची प्रॉपर्टी जप्त केली तर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिव्या दिल्या. नाव न घेता राज ठाकरेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे
राज ठाकरे नाही तर शरद पवारांनी भूमिका बदलली : राज ठाकरे
देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही, ही बोलणारी बाळासाहेब ठाकरे ही पहिली व्यक्ती. त्यानंतर हा धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. निवडणुकानंतर पुन्हा दोन महिन्याात भूमिका बदलली आणि कृषीमंत्री झाले. राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली
राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे
मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही : राज ठाकरे
देशात समान नागरी कायदा आणा : राज ठाकरे
देशात समान नागरी कायदा आणा. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा असे नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे. या गोष्टी देशात होणे आवश्यक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे
जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले : राज ठाकरे
भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं. दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..